कन्नड भाषा, कर्नाटक यांच्याशी आमचे भांडण नसून आमचे भांडण त्यांच्या नेत्यांशी आहे, त्यांच्या धोरणाशी आहे!
सीमाप्रश्नाबाबत झगडत असताना राष्ट्रीय दृष्टीकोन कुणीही टाकू नये. कटुता, वैरभाव नको. स्वकीयांवर पोलीस शस्त्रे उगारतात, हे स्वतंत्र भारताला शोभत नाही. लष्कर-पोलीस स्वकीयांविरुद्ध वापरण्यासाठी नसून ते चीन-पाकिस्तान अशा आक्रमकांविरुद्ध वापरण्यासाठीच असायला पाहिजे. सीमाप्रश्नाच्या बाबतीत पार्लमेंटचे मत मी महाराष्ट्राच्या बाजूला वळवू शकेन, असा मला विश्वास वाटतो; कारण सीमेचा प्रश्न हा न्यायाचा आहे, नीतीचा आहे.......